लव्ह जिहादची कारणे आणि त्यावरील उपाय !

‘पैगाम इस्लाम’ संघटनेने वशीकरणाचा उपयोग करावा’, असा ‘फतवा’ काढला आहे. वयाच्या १७-१८ वर्षांपर्यंत ‘हिंदु संस्कारानुसार वाढलेली युवती एकाएकी मुसलमानाची दासी बनायला सिद्ध होते’, यामागे आपण बुद्धीने विचार करू शकणार नाही, अशी कारणे आहेत. जेव्हा मुलीचे आई-वडील न्यायालयात अभियोग प्रविष्ट करतात, तेव्हा त्या मुलीवर वशीकरण केले गेले असल्यामुळे ती न्यायालयात तिच्या पतीच्या बाजूने बोलते. ‘केरळमधील चर्चने ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी काळ्या जादूचा वापर करत असल्याचे म्हटले.

१. वशीकरण !

वशीकरण किंवा करणी यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी करावयाचे काही आध्यात्मिक उपाय

१. प्रथम पीडित मुलीजवळ असलेल्या सर्व वस्तू, तसेच अंगावर बांधलेले तावीज, गंडे-दोरे, विभूती अशा काही वस्तू असल्यास त्या तिच्यापासून लांब ठेवाव्यात. त्या वस्तू त्वरित अग्नीत विसर्जित कराव्यात.

२. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिच्या कुलदेवतेचा नामजप सतत करावा.

३. लिंबू आणि सात्त्विक उदबत्तीची विभूती यांच्या साहाय्याने पुढीलप्रमाणे उतारा काढावा. त्या तरुणीला पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसवावे. उतारा उतरवणार्‍या व्यक्तीने आपले दोन्ही हात एकत्र करून त्यांत न कापलेले लिंबू आणि उदबत्तीची विभूती घ्यावी आणि त्या वस्तू बाधित तरुणीसमोर धराव्यात आणि पुढील प्रार्थना करावी – ‘या तरुणीला होणारा वाईट शक्तींचा त्रास या उतार्‍याच्या माध्यमातून दूर होऊ दे.’ त्यानंतर आपल्या हातांतील लिंबू आणि विभूती यांनी तरुणीच्या पायांपासून डोक्यापर्यंत घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकार तीन वेळा ओवाळावे. शेवटी तो उतारा वहात्या पाण्यात विसर्जित करावा. उतारा उतरवणार्‍या व्यक्तीने उतारा विसर्जित करेपर्यंत मनात आपल्या उपास्यदेवतेचा नामजप करावा आणि त्यानंतर हात-पाय धुवावेत. त्या तरुणीलाही हात-पाय धुवायला सांगावेत आणि त्यानंतर तिच्या अन् स्वतःच्या अंगावर गोमूत्र किंवा विभूतीयुक्त पाणी शिंपडावे. तरुणीला कपाळावर देवापुढील किंवा पवित्र स्थानाची विभूती लावावी.

४. नारळाने दृष्ट काढणे : वरील उपायानंतरही त्या तरुणीवरील वशीकरणाचा किंवा करणीचा त्रास दूर न होऊन तिचे भ्रमिष्टासारखे वागणे आणि ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवलेल्या मुसलमानाची आठवण काढणे चालूच राहिले, तर तिची नारळाने दृष्ट काढावी. या पद्धतीत तरुणीला पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसवावे. सोललेला शेंडी असलेला नारळ हातांच्या ओंजळीत घेऊन त्या तरुणीच्या समोर उभे रहावे. नारळाच्या शेंडीचे टोक तरुणीसमोर धरून प्रार्थना करावी – ‘हे मारुतिराया, या तरुणीच्या देहातील आणि देहाबाहेरील त्रासदायक स्पंदने तू या नारळामध्ये खेचून घेऊन त्यांचा समूळ नाश कर.’ त्यानंतर तो नारळ त्या तरुणीच्या पायांपासून डोक्यापर्यंत घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वर्तुळाकार पद्धतीने ३ वेळा फिरवावा. नंतर त्या तरुणीभोवती ३ प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालतांना नारळाच्या शेंडीचे टोक सातत्याने त्या तरुणीकडे असावे. दृष्ट काढून झाल्यावर तो नारळ मारुतीच्या देवळात फोडावा किंवा अग्नीमध्ये अर्पण करावा. त्या वेळी ‘हनुमानाचा विजय असो !’, असा जयघोष करावा.

५. बाधित तरुणीवर उतारा उतरवल्यावर किंवा तिची नारळाने दृष्ट काढल्यावर तिला अंघोळीच्या बालदीभर पाण्यात मूठभर खडेमीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ करण्यास सांगावे.

६. तरुणीला देवाला प्रार्थना करण्यास आणि एक घंटा (तास) तिच्या कुलदेवतेचा किंवा उपास्यदेवतेचा नामजप करण्यास सांगावे. तिला एक वेळा प्रतिदिन मारुतिस्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हणण्यास सांगावे.

७. गाणगापूरसारख्या जागृत तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी किंवा संतांच्या आश्रमात काही काळासाठी मुलीसह वास्तव्य करावे.

८. मुलांमुलींना साधना शिकवली, देवाचे साहाय्य घ्यायला शिकवले, तर करणी, जादू, अनिष्ट शक्ती यांच्या आक्रमणांपासून देवच त्यांचे रक्षण करील. अशी मुले बरे-वाईट जाणू शकतील.

(संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘लव्ह जिहाद’)  

२. हिंदु मुलींच्या पालकांचे दुर्लक्ष आणि दायित्व !

मुलींशी आवश्यक ती जवळीक, प्रेम, आत्मियता असल्यास मुली प्रत्येक गोष्ट घरी येऊन सांगतात. बहुतेक पालकांचे ‘मुली काय करतात ?’, याकडे लक्ष नसते. कुटुंबात आई-वडिलांनी दिलेले अनिर्बंध स्वातंत्र्य, मुलीच्या वर्तनावर आणि वागणुकीवर फाजिल विश्वास ठेवणे, शिवाय मुसलमान युवकांचा सातत्याचा ससेमिरा, यात स्वतःच्या संस्कारांपासून, आई-वडिलांपासून, भाऊ-बहिणींपासून भावनिकदृष्ट्या लांब जात असुरांच्या कळपात ती केव्हा मिसळते, हे तिचे तिलाच कळत नाही. (साप्ताहिक ‘राष्ट्रपर्व’, २२.६.२००९)

‘आपल्या मुलीच्या मानसिक जडणघडणीकडे आपण किती गांभीर्याने पाहिले पाहिजे’, अशी जाणीव हिंदूंमध्ये उत्पन्न होणे आवश्यक आहे. आपल्या तरुण मुलीचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ?, ती कुणासमवेत अधिक वेळ घालवते ?, भ्रमणभाषवर अधिक वेळ बोलणे होते का ?, तिचे कुणी मुसलमान मित्रमैत्रिणी आहेत का ?, कुणा धर्मांध मुलाशी बोलणे-चालणे होते का ? आदी गोष्टी पहाणे आवश्यक आहे.

३. धर्माचरणाचा अभाव !

एकतर्फी सर्वधर्मसमभाव, पाश्चात्त्य शिक्षणामुळे बोकाळलेली विलासी वृत्ती, चित्रपटसृष्टीतील भोगवाद, दूरदर्शन अन् सामाजिक मालिकांचा दुष्परिणाम, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपली मुले-मुली वास्तवापासून दूर गेली आहेत. इतिहास आणि धर्म यांचे ज्ञान नसल्याने हिंदु मुलींना धर्माभिमान नसणे, तसेच धर्मशिक्षण नसल्याने धर्माचरण किंवा धर्मपालन न  करणे यांमुळे धर्माचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे धर्माचा अभिमान नाही. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्माविषयी अपसमज अन् अज्ञान आहे. आपल्या मुलींना मुसलमानांचा हिंदूंवरील अत्याचारांचा इतिहास ठाऊक नाही. यात पालकांकडून मुलींकडे दुर्लक्ष झाल्यावर हे सर्व अनिष्ट योग जुळून लव्ह जिहादचा मार्ग सुकर होतो.

पालकांनी मुलांवर लहानपणापासूनच धार्मिकतेचे आणि साधनेचे संस्कार केले म्हणजेच धर्मशिक्षण दिले, तर लव्ह जिहादला पूर्णपणे रोखणे शक्य आहे. धर्माचरणामुळे मिळणार्‍या चैतन्याने योग्य-अयोग्य समजण्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत रहाते. भारतीय केशरचना, पोशाख, कुंकू लावणे आदी धर्माचरण, काही ना काही उपासना किंवा नामजपादी साधना करणे, स्तोत्र आदी म्हणणे आदींमुळे हिंदु मुलींमधील सात्त्विकता वाढून त्यांच्यात आत्मबळ निर्माण होते, तसेच धर्माभिमान निर्माण होतो. अशा मुली लव्ह जिहादला बळी पडण्याची शक्यता नसते.

४. भारतीय स्त्रीने दुर्गावतार धारण करून आपल्या प्रचंड शक्तीचे रूप या नरकासुरांना दाखवावे ! 

पालकांची स्वतःच्या बायकांना काळ्या कपड्यात झाकून हिंदु स्त्रीच्या सौंदर्यावर दृष्टी टाकणारे हे धर्मांध कलियुगातील रावण आहेत. भोळ्याभाबड्या दिसत असलेल्या भारतीय स्त्रीने दुर्गावतार धारण करून तिच्या प्रचंड शक्तीचे रूप या नरकासुरांना दाखवावे. – सौ. दुर्गा सरदेसाई, अमेरिका (९.१.२०१०)

महाराणी पद्मिनीने केलेला जोहार, पाकिस्तान फाळणीच्या वेळी नराधमांनी स्त्रियांवर केलेले अमानुष अत्याचार यांसंदर्भात मुलींना सांगायला हवे. मुलींमधील ‘दुर्गातत्त्व’ जागृत करायला हवे.

५. हिंदु कुटुंबांत लव्ह जिहादच्या विरोधात जागृती व्हायला हवी !

लव्ह जिहादच्या षड्यंत्राविषयी प्रत्येक हिंदु माता-पित्यांनी त्यांच्या मुलींचे आधीपासूनच प्रबोधन करणे, त्यांना विश्वासात घेऊन लव्ह जिहादचा संभाव्य धोका आणि राष्ट्र-धर्म यांवरील या संकट यांविषयी सांगणे आवश्यक आहे. अन्य पंथियांची कपटी कारस्थाने, कुटील हेतू, त्याला बळी पडलेल्या असंख्य कन्यांची दुरवस्था त्यांच्या कानावर घालायला हवी. त्यासाठी प्रथम पालकांनी लव्ह जिहादचे गांभीर्य ओळखले पाहिजे. – सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, गोवा.