विविध पुराणांमधील अक्षय्य तृतीया !

१. स्कंदपुराण : जी माणसे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करतात आणि कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी जे दान करतात, त्यांच्या या पुण्यकार्याला देव अक्षय फळ देतो.

२. भविष्यपुराण : ‘वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा मनुष्य सगळ्या पापांतून मुक्त होतो’, असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे. जे काही दान केले जाते ते अक्षय होते. विशेषतः मोदक दिल्याने आणि गुळ अन् कापराच्या साहाय्याने जलदान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. अशा माणसांची ब्रह्मलोकांत गणना होते.

३. विष्णुपुराण : वैशाख मासातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म, तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दान केल्याने अक्षय्य फळाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपवास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होतो.

(साभार : महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ)