प्रतिवर्षी प्रत्येक भारतीय ५० किलो अन्न वाया घालवतो ! – अहवाल
नवी देहली – केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना लहानपणीच अन्न वाया जाऊ न देण्याचा धडा शिकवला जावा, असा निर्णय घेतला आहे. ताटात शिल्लक राहिलेल्या अन्नाचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले जाईल. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिशानिर्देशही जारी केले आहेत.
‘द युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम’च्या वर्ष २०२१ मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार भारतात प्रत्येक व्यक्ती प्रतिवर्षी ५० किलो अन्न वाया घालवते. ही नासाडी शेतातून धान्य निघाल्यापासून अन्न ताटात पडण्यापर्यंतची आहे. शेतातून गहू आणि भाज्या बाजारात पोचेपर्यंत पुष्कळ प्रमाणात वाया जातात. अनेक लोक ताटात उष्टे अन्न टाकतात. यामुळेही अन्न वाया जाते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’, ही हिंदु धर्माने दिलेली शिकवण आहे. हिंदू हे विसरल्याने त्यांना त्याचे शिक्षण द्यावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद ! |