एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड !

विमानामध्ये महिला सहप्रवाशावर पुरुष प्रवाशाने लघुशंका केल्याचे प्रकरण

नवी देहली – नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने २६ नोव्हेंबर २०२२ च्या न्यूयॉर्क-देहली विमानामध्ये महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या प्रकरणी एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या विमानाच्या पायलट-इन-कमांडचा परवाना निलंबित केला आहे. एअर इंडियाच्या ‘डायरेक्टर इनफ्लाईट सर्व्हिसेस’वर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

संपादकीय भूमिका

असे कुकृत्य करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाईही झाली पाहिजे !