देहलीतील ब्रह्मपुरी येथे हिंदू घरे विकून करत आहेत स्‍थलांतर

मुसलमानांच्‍या वाढत्‍या लोकसंख्‍येमुळे हिंदूंचा निर्णय !

ब्रह्मपुरीच्या गल्ली क्रमांक १३ मध्ये पसरलेली शांतता

नवी देहली – देहलीतील ब्रह्मपुरीमधील गल्ली क्रमांक १३ मध्‍ये हिंदूंनी घरे विकून स्‍थलांतर करण्‍यास प्रारंभ केला आहे. या गल्लीत शिव-गौरी नावाचे एक मंदिर आहे. मंदिरापासून १०० मीटरवर एक मशीद आहे. या मशिदीविषयी अधिवक्‍ता प्रदीप शर्मा म्‍हणाले, ‘‘पूर्वी त्‍या जागेवर एका ब्राह्मण हिंदूचे घर होते. ते विकत घेऊन तेथे मशीद बांधण्‍यात आली. या गल्लीत ७० टक्‍के हिंदू आणि ३० टक्‍के मुसलमान होते; परंतु गेल्‍या ५ वर्षांत लोकसंख्‍येचे संतुलन झपाट्याने बिघडले आहे.’’ वर्ष १९६२ पासून ब्रह्मपुरी येथे असलेल्‍या स्‍वतःच्‍या खासगी घराचे वर्णन करतांना प्रदीप शर्मा म्‍हणाले की, आमच्‍या लहानपणी मुसलमानांची संख्‍या आता दिसते तितकी नव्‍हती.

मुसलमानांच्‍या ४ कुटुंबांसाठी कोट्यवधींची मशीद !

ब्रह्मपुरीमध्‍ये होत असलेल्‍या लोकसंख्‍येच्‍या पालटाविषयी बोलतांना विपिन शर्मा यांनी सांगितले की, ब्रह्मपुरीच्‍या गल्ली क्रमांक ८ मध्‍ये मुसलमानांची केवळ ४ घरे आहेत, तरीही तिथे कोट्यवधी रुपये खर्च करून मशीद बांधण्‍यात आली आहे.

हिंदु संघटनांनी या मशिदीला जोरदार विरोध केला होता; परंतु आम आदमी पक्षाचे तत्‍कालीन आमदार हाजी बुरा यांनी त्‍यांच्‍या सहस्रो समर्थकांसह त्‍या भूमीवर नमाजपठण केले. (धर्मांधांचा भरणा असलेला आम आदमी पक्ष ! असा पक्ष सत्तेवर असतांना देहलीचे ‘हिरवेकरण’ झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक) मशिदीला विरोध करणार्‍या हिंदु संघटनांवर दबाव आणण्‍यात आला.

संपादकीय भुमिका

अशी स्‍थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? देशाच्‍या राजधानीत हिंदूंची अशी स्‍थिती असेल, तर अन्‍यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !