देहलीतील भिंतीवर लिहिण्यात आली ‘खलिस्तान झिंदाबाद’ची घोषणा !

नवी देहली – येथील पश्‍चिम विहार भागातील एका भिंतीवर ‘खलिस्तान झिंदाबाद’ आणि ‘जनमत २०२०’ अशा घोषणा लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांना या घोषणांविषयीची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन या घोषणा पुसून टाकल्या. पोलीस घोषणा लिहिणार्‍यांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका 

देशद्रोही खलिस्तानी चळवळ देशात पुन्हा वळवळू लागली आहे. तिला आताच ठेचण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा मागील चुकीप्रमाणे आता चूक केली, तर पुन्हा एकदा मोठी हानी होऊ शकेल !