नवीन संसद भवनाच्या अशोक स्तंभावरील सिंहांच्या चेहर्‍यात पालट केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

नवीन संसद भवनाच्या अशोक स्तंभावरील सिंहांच्या चेहर्‍यात पालट केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

विरोधकांचे म्हणणे आहे की, अशोक स्तंभाच्या सिंहांना क्रूर आणि आक्रमक बनवण्यात आले आहे.

देशभरात आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक पाऊस

देशभरात आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक पाऊस

पुढील ४ दिवस ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मनमानी आणि अविचाराने होणारी अटक, ही वसाहतवादी मानसिकता दर्शवते ! – सर्वोच्च न्यायालय

मनमानी आणि अविचाराने होणारी अटक, ही वसाहतवादी मानसिकता दर्शवते ! – सर्वोच्च न्यायालय

आरोपीच्या नियमित जामीन अर्जावर साधारतः २ आठवड्यांच्या आत आणि अंतरिम अर्जावर ६ आठवड्यांच्या आत निर्णय झाला पाहिजे. कुणालाही अटक करण्यापूर्वी भारतीय दंड सहितेच्या कलम ४१ आणि ‘४१ अ’चे पालन केले पाहिजे

शिवसेनेच्या ११ खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट !

शिवसेनेच्या ११ खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवण्यासाठी हे खासदार अमित शहा यांना भेटले.

नवीन संसद भवनाच्या छातावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनावरण

नवीन संसद भवनाच्या छातावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनावरण

राष्ट्रीय प्रतीक असणार्‍या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.

न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी विजय माल्या याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी विजय माल्या याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी ४ मासांच्या कारावासाची, तसेच २ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५ वर्षांत ८ पटींनी वाढ

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५ वर्षांत ८ पटींनी वाढ

संरक्षण क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या प्रयत्नांना सातत्याने यश मिळत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही १३ सहस्र कोटी रुपयांवर पोचली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गव्हानंतर आता गव्हाच्या पिठावरही निर्यातबंदी

गव्हानंतर आता गव्हाच्या पिठावरही निर्यातबंदी

गव्हाच्या पिठासह मैदा, रवा आदी पदार्थांच्या निर्यातीवरही बंदी असेल. या पुढे निर्यातीसाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्यक असल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली.

देहलीतील फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांना ठार मारण्याची धमकी

देहलीतील फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांना ठार मारण्याची धमकी

कट्टरतावादी मुसलमानांकडून हिंदूंना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशा वेळी ‘समतोल’ साधण्यासाठी त्यांच्याच धर्मबांधवांनी इमामांना धमक्या देऊन ‘आम्हालाही धमक्या मिळतात’ असे दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, तर यात आश्‍चर्य वाटू नये !