कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी ! – जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी असल्याचे सांगितले आहे. कोरोनासंबंधी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन आपत्कालीन समितीने बैठक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी असल्याचे सांगितले आहे. कोरोनासंबंधी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन आपत्कालीन समितीने बैठक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी केले.
रेल्वेगाड्यांमधील स्लीपर कोच, तसेच अन्य गाड्यांमध्ये टियर-२ सामान नेण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने नियम निश्चित केले आहेत. प्रवाशाच्या तिकिटानुसार त्याने न्यायच्या सामानाचे वजन निश्चित केले जाते आणि त्यानुसार रेल्वेगाडीमध्ये सामान नेले जाऊ शकते.
या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचे आहे, हे सर्वसाधारण जनतेला स्पष्ट व्हायला हवे !
बलात्कार हा केवळ पीडितेसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी निंदनीय आहे. अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांमध्ये विशेषकरून लैंगिक अत्याचारांमध्ये चिंताजनक वाढ होत असतांना न्यायालयांनी सुज्ञ कायदेशीर उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते.
एका अमेरिकी डॉलरमागे ८३ भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय भांडवली बाजारात केलेल्या समभागांच्या विक्रीमुळे हे अवमूल्यन झाल्याचे सांगण्यात आले.
देहली राज्यामध्ये फटाक्यांची निर्मिती, संग्रह आणि विक्री करणार्यांना ५ सहस्र रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती देहलीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिली.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. त्यांना ७ सहस्र ८९७, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना केवळ १ सहस्र ७२ मते मिळाली. या निवडणुकीत ४०० हून अधिक मते बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती आणली आहे. याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरून हा आदेश देण्यात आला आहे.
क्रांतीकारकांचा अवमान करणार्या केजरीवाल यांनी क्षमा मागण्याचे भगतसिंह यांच्या कुटुंबियांची मागणी