Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती

नवी देहली – केंद्र सरकारने वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवर ८.२५ टक्के व्याजदराला संमती दिली आहे. व्याजाची रक्कम याच महिन्यात संबंधितांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते.

याचा लाभ ७ कोटींहून अधिक लोकांना होणार आहे. खात्यात १ लाख रुपये जमा असतील, तर ८ सहस्र २५० रुपये व्याज मिळणार आहे. खातेदार epfindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन रक्कम पाहू शकतात.