
मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संसदीय दलाच्या बोलावलेल्या बैठकीत लोकसभेतील ९ पैकी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तिघे खासदारच उपस्थित राहिले, तर उर्वरित ६ खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षाने व्हीप (एखाद्या राजकीय पक्षाने त्याचे आमदार किंवा खासदार यांना दिलेले अधिकृत निर्देश) बजावूनही खासदार अनुपस्थित होते. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील अशी त्यांची नावे आहेत. या अनुपस्थितीनंतर ठाकरे गटाने संबंधित खासदारांना तातडीने ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्याची प्रक्रिया चालू केली आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याचा प्रस्ताव सादर केला असल्याचे समजते.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर