भारतीय नोटांवर श्रीलक्ष्मी आणि श्रीगणेश यांचे चित्र छापावे !
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजवरीवाल यांची मागणी
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजवरीवाल यांची मागणी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘आतंकवाद प्रतिबंधक समिती’ची महत्त्वाची बैठक २८ आणि २९ ऑक्टोबर या दिवशी भारतात होत आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत, तर २९ ऑक्टोबरला देहलीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आतापर्यंत विविध आस्थापनांच्या दिवाळीसंदर्भातील विज्ञापनांमध्ये हिंदूंच्या सांस्कृतिक चिन्हांचा उपयोग केला जात होता; परंतु गेल्या ४-५ वर्षांतील विज्ञापनांत पणत्या, रांगोळ्या, फुले आणि त्यानंतर हिंदु स्त्रियांच्या कपाळावरील कुंकू गायब होत गेले.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य बंगालच्या उपसागरावर ‘सितरंग’ नावाचे चक्रीवादळ सिद्ध झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकत जाईल.
‘दीपावली’ हा शब्द ‘दीप’ आणि ‘आवली (ओळ)’ या शब्दांनी बनला आहे. त्याचा अर्थ दिव्यांची ओळ असा आहे. त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. त्या वेळी अयोध्यवासियांनी दीपोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून दीपावली हा सण चालू झाला आहे.
लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता असलेल्या देशामध्ये द्वेषापायी करण्यात येणारी हिंसा अन् वक्तव्ये धक्कादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना नोंदवले.
‘ताजमहाल हे मूलत: शिवमंदिर आहे’, असे सांगणार्या आणि त्याचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करणार्या भाजपचे नेते रजनीश सिंह यांची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !
इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात रशियाच्या गुप्तचर संस्था केजीबीच्या हस्तकांचा देशात सुळसुळाट झाला होता, असे म्हटले जाते. आता पाकिस्तानच्या हस्तकांचा सुळसुळाट असतांना चीनचेही गुप्तचर भारतात कारवाया करत आहेत, हे पहाता ‘भारत या देशांसाठी धर्मशाळाच झाली आहे का ?’, असा प्रश्न पडतो !
देहली सरकारकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक गोष्टी होत नसतील, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना कशा होतील, ते पाहिले पाहिजे; अन्यथा चीनप्रमाणे एक मास सर्वच बंद करून सर्वांनाच घरात बसावे लागेल. परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास देहलीतही तो दिवस दूर नाही, हे निश्चित !