
सातारा, १८ जून (वार्ता.) – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी वीज वितरणच्या कर्मचार्यांकडून वीजवाहिन्या, खांब, विद्युत्जनित्र आदींच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून होणारे अपघात अन् वीज खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी कामे पूर्ण केली जात आहेत.
जीर्ण तारा बदलणे, सैल खांब मजबूत करणे, विद्युत्जनित्रांची दुरुस्ती करणे, वीजवाहिन्यांच्या मार्गातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. आपत्कालीन स्थितीला प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकेही सिद्ध केली आहेत. तात्पुरता वीजपुरवठा बंद ठेवावा लागल्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले