
पणजी, १८ जून (वार्ता.) – गेल्या काही आठवड्यांपासून सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडत असलेल्या गोव्याला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ जूनपासून राज्यात पावसाच्या सरी कोसळण्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याचे संचालक नाहुष कुलकर्णी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘आतापर्यंत गोव्यात सरासरीपेक्षा अनुमाने ६० टक्के अल्प पावसाची नोंद झाली आहे. गोव्यात जून २०२३ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी जून मासात पावसाचे प्रमाण अनुमाने ७० टक्के अल्प होते; मात्र जुलैमध्ये पावसाने जोर धरला आणि राज्यात भरपूर पाऊस पडला होता. येत्या काही आठवड्यांत हवामानाची स्थिती सुधारेल आणि गोवाभर पावसाची तीव्रता वाढणार आहे.’’ सध्या गोव्यात पावसाच्या तुटवड्याला प्रामुख्याने ‘एल् निनो’चा (जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी सामान्यापेक्षा अधिक गरम होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल् निनो’, असे म्हणतात.) प्रभाव उत्तरदायी असल्याचे मानले जात आहे. पावसाअभावी शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
‘सव्यसाचि गुरुकुलम्’ चे प्रधान आचार्य लखन जाधवगुरुजी ‘गुरुवर्य’ पुरस्काराने सन्मानित !