
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन, तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी राज्यशासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता वाढवण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे आमदार राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर, उपमहापौर, जलसंपदा विभागाचे आणि ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत इचलकरंजी शहराची वाढती पाणी आवश्यकता, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत, तसेच तालुक्यातील गावांच्या पाणीपुरवठ्याविषयी खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांनी सादरीकरण केले. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘कृष्णा नदी ही ३ राज्यांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची नदी आहे. कोणत्याही राज्याची हानी न करता संबंधित भागाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढवण्याचे विविध पर्याय अधिकार्यांनी पडताळून पहावेत. या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक गोष्टींचा आढावा घेऊन शासनाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.’’
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा