
पुणे – भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर भाविकांसाठी खुले करतांना सुरक्षा आणि विकासकामात अडथळा येऊ नये, यासाठी ऑनलाईन पासधारक भाविकांनाच दर्शन घेण्याची सुविधा चालू करण्यात आली होती; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाने दर्शनासाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ११ या कालावधीत १८ जूनपासून सर्व भाविकांना कोणत्याही ‘ऑनलाईन पास’ किंवा तिकिटाविना विनामूल्य दर्शन घेण्यात येणार आहे, तसेच ज्या भाविकांना तातडीने दर्शन घ्यायचे असेल, त्यांना २२ जूनपासून त्र्यंबकेश्वरच्या धर्तीवर अडीच सहस्र रुपयांमध्ये ‘तात्काळ दर्शन’ सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
दुपारनंतर मंदिराचे काम होणार आहे. महिनाभरात भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन दुपारी १ वाजेपर्यंत दर्शनासाठी वेळ वाढवण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
‘सव्यसाचि गुरुकुलम्’ चे प्रधान आचार्य लखन जाधवगुरुजी ‘गुरुवर्य’ पुरस्काराने सन्मानित !