
कोल्हापूर – श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी, श्री संत सेवा संघाचे साधक, ‘सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थे’चे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधवगुरुजी यांचा ‘स्वयंसिद्धा’ आणि डॉ. ‘व्ही.टी. पाटील फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त वर्धापनदिनानिमित्त देवल क्लब येथे आयोजित कार्यक्रमात कै. जिनेंद्र शिरोळकर यांच्या स्मरणार्थ ‘गुरुवर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि १० सहस्र रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
श्री. लखन गुरुजींनी ‘भारतीय युद्धशास्त्र’ या विषयाचे सखोल प्रशिक्षण देणार्या शस्त्र आणि शास्त्र यांचे ज्ञान भारतीय परंपरेवर आधारित देणार्या ‘सव्यसाचि गुरुकुलम्’ची निर्मिती केली आहे. या माध्यमातून देशातील युवा पिढीला संस्कारी, प्रखर देशभक्त, चारित्र्यवान आणि सामर्थ्यवान बनवण्याचे कार्य चालू आहे. त्याचसमवेत शिवकालीन युद्धकला जपून आणि शिवकालीन शस्त्रांचा संग्रह करून त्याचे केलेले जतन, संवर्धन याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात मुख्य पुरस्कार ‘स्व. कांचनताई परुळेकर स्मृती गौरव पुरस्कार’ डॉ. सुधाताई कोठारी यांना देण्यात आला.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !