
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रेफेक्टरी) चालवणार्या ‘मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’चा अन्न परवाना, अन्न व औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) निलंबित केला आहे. अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने १६ जूनला ‘एफ्.डी.ए.’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली. या वेळी अनेक गंभीर अनियमितता निदर्शनास आल्या असून या त्रुटींमुळे अन्न सुरक्षिततेस बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्यांनी नमूद केले आहे.
पडताळणीच्या वेळी प्रामुख्याने अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा मोठा अभाव दिसून आला. अन्न हाताळणीत अस्वच्छता असून कच्चे आणि शिजवलेले अन्न योग्य प्रकारे वेगळे ठेवलेले नाही, तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे आणि कर्मचार्यांच्या वैद्यकीय पडताळणीचे कोणतेही आवश्यक अभिलेख (रेकॉर्ड) उपलब्ध नसून अपुर्या स्वच्छतेमुळे कीटक नियंत्रणातही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत