हिंदु विद्यार्थिनींना कुंकू किंवा टिकली लावण्यास विरोध केल्याचे प्रकरण

सोलापूर – डफरिन चौक येथील ‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील हिंदु विद्यार्थिनींचा मानसिक छळ करून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत काही विद्यार्थिनींनी ‘सकल हिंदु समाजा’चे समन्वयक श्री. शिवराज गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार प्रविष्ट केली. त्यात शिक्षिका रमेजा कन्पली आणि संस्थेचे प्राचार्य हरिदास प्रदीप यांच्या विरोधात आरोप केले आहेत. विद्यार्थिनींनी कपाळावर कुंकू किंवा टिकली लावल्यास त्यांना धमकावले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर ‘सकल हिंदु समाजा’चे कार्यकर्ते श्री. सूरज भोसले यांच्या वतीने संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदन दिल्यावर चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली.
तक्रारीत म्हटले की,
शिक्षिका कन्पली प्रेमसंबंधांविषयी चर्चा करतात. विद्यार्थिनींची छायाचित्रे मुसलमान मुलांना दाखवतात. (हा ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार असून संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) प्राचार्य हरिदास प्रदीप यांनी कायमस्वरूपी शिक्षिकेचे स्थानांतर करून तिच्या जागी रुक्सार शेख यांची अनधिकृत नियुक्ती केली.
विद्यार्थिनींना अल्प पाणी पिण्याचा सल्ला दिला जात असल्याने त्यांना स्वच्छतागृहाचा वापर अल्प करावा लागतो. ‘आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा सकल हिंदु समाजाच्या वतीने सोलापूरमध्ये आंदोलन करू’, असे शिवराज गायकवाड म्हणाले. या वेळी सर्वश्री सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव म्हेत्रे, बाबा बनसोडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. (शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची श्रद्धा, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांवर आघात होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
हिंदु महिलेला ओलीस ठेवून, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणार्या मुसलमान दांपतत्याला अटक
ठाणे येथे माजी खासदार विनायक राऊत आणि कुटुंबिय यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू