पुण्यात हवाला व्यवहारावर गुन्हे शाखेची कारवाई !

अवैध गुटखाविक्रीद्वारे प्राप्त केलेल्या मोठ्या रक्कमेची हवाला व्यवहाराच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने २ डिसेंबरच्या मध्यरात्री उघडकीस आणला.

चित्रपटसृष्टीची कथा !

सर्व पहाता चित्रपटसृष्टीची शुद्धी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाच्या शुद्धीसाठी आणि त्याच्यावर सुसंस्कार करण्यासाठी हे अगत्याचे झाले आहे; कारण चित्रपट हे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते.

हासन (कर्नाटक) येथे पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारावर धर्मांध कसायांचे आक्रमण

महिला पत्रकाराने घटनास्थळी जाऊन अवैध पशूवधगृह उघडण्याची मागणी केल्यावर येथे जमलेल्या धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

निपाणी येथील श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटीची चोरी

येथील बडमंजी ‘प्लॉट’मध्ये असणार्‍या श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्रांहून अधिक रुपयांची चोरी केल्याची घटना २९ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. याशिवाय बसस्थानक परिसरातील मद्यालयातही चोरीची घटना घडली आहे.

यवतमाळ जिल्हा कारागृहातील बंदीवानाकडून पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक आक्रमण

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृह वर्ग १ येथे १ डिसेंबर या दिवशी सकाळी कारागृह अधीक्षक (श्रेणी २) प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन बंदीवानांची पडताळणी करत होते. तेव्हा त्यांच्यावर राहुल उपाख्य सिन्नू शिंदे या बंदीवानाने दाढी करण्याच्या कारणावरून प्राणघातक आक्रमण केले.

बारामती तालुक्यात सव्वा मासाच्या बालिकेला आईनेच मारल्याची धक्कादायक घटना

सव्वा मासाच्या बाळाच्या मृत्यूच्या प्रकरणी बाळाची आई दीपाली संजय झगडे हिच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील चंदननगर भागात ही घटना घडली.

२६ लाख रुपयांचे चंदन शिक्रापूर (जिल्हा पुणे) येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून कह्यात

मुळशी आणि भोसरी परिसरातून चोरून आणलेला अनुमाने २६ लाख रुपयांचा चंदनाचा साठा घेऊन नगर येथे निघालेल्या चंदन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने १ डिसेंबरच्या मध्यरात्री शिक्रापूर येथे पकडले आहे.

नाशिक येथील नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण

नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर अस्लम सईद सैय्यद या संशयितIने आक्रमण करत त्यांना शिवीगाळ केली.

मुंबई येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांध महिलेला अटक

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.