अमली पदार्थ विक्रीचे प्रकरण
कोल्हापूर – ‘एम्.डी.’ (मेफेड्रॉन) या अमली पदार्थ विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समीर तथा साजन तथा पाबलो गुलाब शेख आणि त्याचा सहकारी कुख्यात शस्त्रतस्कर मनीष नागोरी यांना अटक केली आहे. पाबलोकडून ३६ सहस्र रुपये मूल्याचे अमली पदार्थ, भ्रमणभाष आणि आलिशान गाडी असा १५ लाख ५१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अधिक अन्वेषण करत आहे.
शस्त्रतस्कर असलेला मनीष नागोरी याने आता अमली पदार्थ विक्रीमध्ये इचलकरंजी शहरात त्याचा अवैध व्यवसाय वाढवला आहे. या प्रकरणात ‘एम्.डी.’ या अमली पदार्थाचा तोच मुख्य पुरवठादार असल्याचे समोर आले आहे. त्याच्या अन्वेषणातून मोठी ‘टोळी’ उघडकीस येण्याची शक्यता आहे.