कोल्हापूर – गणेशोत्सव काळामध्ये गांधीनगरमध्ये कार्बाइट सदृश्य रासायनिक गॅस भरून फुगे फुगवले जातात. कोणत्याही ‘हॉलमार्क’विना असणारे सिलेंडर घेऊन गर्दीच्या ठिकाणी फुगे विक्रेते फुगे फुगवून देतात. यापूर्वी लातूर येथे अशाच प्रकारच्या सिलेंडरचा स्फोट होऊन काही लहान मुले गंभीर घायाळ झाली होती. त्यामुळे गांधीनगर येथे फुगे फुगवणार्याला उद्धव ठाकरे गटाच्या करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी जाब विचारला, तसेच प्रशासनाने सिलेंडर वापराविषयी विक्रेत्यांना फुगे विकण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणी केली. (सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांच्या हे का लक्षात येत नाही ? सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाचा हा हलगर्जीपणा मुलाच्या जिवावर बेतू शकतो ! – संपादक) या प्रसंगी सर्वश्री शरद माळी, योगेश लोहार, दिलीप सावंत, दीपक पोपटाणी, दीपक धिंग, दीपक अंकल, सुनील पारपाणी यांसह अन्य उपस्थित होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > गांधीनगर येथे धोकादायक सिलेंडरने फुगे फुगवणार्याला राजू यादव यांनी खडसावले
गांधीनगर येथे धोकादायक सिलेंडरने फुगे फुगवणार्याला राजू यादव यांनी खडसावले
नूतन लेख
- पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचे २ सदस्य बडतर्फ !
- कराड येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद !
- हिंदूंनी आपापसांतील भेद विसरून हिंदु धर्मासाठी कार्य करावे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वीजवाहिनीचा धक्का बसून मुलाचा मृत्यू !; विनापावती दंड घेणार्या ३ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद
- नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे दुर्गापूजेस मुसलमानांचा विरोध !
- भिन्न धर्मीय प्रियकराला पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक !