Nazia Elahi Khan: इस्‍लामी कट्टरतावादाच्‍या विरोधात आवाज उठवणार्‍या नाझिया इलाही खान यांना धमक्‍या !

नवी देहली – सामाजिक माध्‍यमांवर इस्‍लामी कट्टरतावादाच्‍या विरोधात आवाज उठवणार्‍या नाझिया इलाही खान यांना १० सप्‍टेंबर या दिवशी ईश्‍वरनिंदा प्रकरणात अटक करण्‍यात आली होती. त्‍यांच्‍यावर प्रेषित महंमद यांचा अपमान केल्‍याचा आरोप होता. त्‍यांच्‍या विरोधात अधिवक्‍ता नूर मेहविश यांनी तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केली होती. या प्रकरणी अलीपूर न्‍यायालयात उपस्‍थित राहिल्‍यानंतर नाझिया यांना जामीन मिळाला असला, तरी त्‍यांच्‍याविषयी कट्टरतावाद्यांचा द्वेष अल्‍प झाला नाही. मुसलमान गटांनी नाझिया यांच्‍याविरुद्ध विष ओकणे चालू केले आहे. नाझिया खान यांना धमक्‍या मिळू लागल्‍या आहेत. एजाज अस्‍लम नावाच्‍या मुसलमान यू ट्यूबरनेही त्‍यांना धमकी दिली आहे.

१. ३ ऑगस्‍ट २०२४  या दिवशी दिलेल्‍या मुलाखतीनंतर नाझिया खान यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता. त्‍यांच्‍या मुलाखतीत त्‍यांनी ‘मुसलमान हिंदु नावाने दुकाने का चालवत आहेत ?’, यावर आक्षेप घेतला होता. हिंदूंना ‘काफिर’ मानणार्‍या सलीम याने महादेवाच्‍या नावाने ढाबा का उघडला, अस प्रश्‍नही त्‍यांनी उपस्‍थित केला होता.

२. या मुलाखतीतल नाझिया यांनी मुसलमानांच्‍या धर्मांधतेविषयी काही उदाहरणे दिली, ज्‍यामुळे वाद निर्माण झाला. ‘हिंदूंनी त्‍याच्‍या दुकानाचे इस्‍लामवरून नाव ठेवल्‍यास गदारोळ होईल आणि त्‍यांना ‘सर तनसे जुदा’ची (शिरच्‍छेदाची) धमकी देण्‍यात येईल’, असे त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या.

३. नाझिया यांनी त्‍यांच्‍या एका व्‍हिडिओमध्‍ये ‘थूंकी जिहाद’चा धोकाही स्‍पष्‍ट केला होता. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या की, नाव पालटून व्‍यवसाय करण्‍याची काय आवश्‍यकता आहे ?ज्‍याच्‍या मनात चोरी असते, तोच हे करतो. या वेळी त्‍यांनी योगी आदित्‍यनाथ यांच्‍या दुकान मालकांनी त्‍यांच्‍या दुकानावर स्‍वतःचे नाव लिहिण्‍याविषयी दिलेल्‍या निर्णयाचे समर्थन केले होते.

संपादकीय भूमिका

इस्‍लामी कट्टरतावादाविषयी जो कुणी बोलतो, त्‍याला जिहाद्यांच्‍या आतंकवादाचा सामना करावा लागतो. याविषयी निधर्मीवादी काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !