मंगळुरू – मंगळुरू तालुक्यातील काटिपळ्ळ शहरात १५ सप्टेंबरच्या रात्री हिंदु आणि मुसलमान यांच्यात संघर्ष झाला. या वेळी मशिदीवर दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला; परंतु पोलिसांनी त्वरित कारवाई केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि परिसरात कुठलीही अनुचित घटना घडली नाही. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दगडफेक करणारे दोघे जण दुचाकीवरून आले आणि दगडफेक करून वेगाने निघून गेले. या घटनेनंतर तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.