बळजोरी केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ! – सतेज पाटील, आमदार, काँग्रेस
गायरान भूमीवर ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण नसून ती त्यांच्या अधिकाराची भूमी आहे. शहरी भागाला वेगळा आणि ग्रामीण भागाला वेगळा न्याय असे का ? आमच्या सरकारने वर्ष २०२२ मध्ये काढलेला शासकीय अध्यादेश अंतिम मानून गायरान भूमीची जागा गावठाण हद्दवाढ म्हणून संमत करावी.