
सातारा, १७ जून (वार्ता.) – कृष्णा नदीपात्रात पसरलेल्या गडद हिरव्या रंगाच्या तवंगामुळे नदीचे पाणी दूषित झाल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ११ जून या दिवशी कृष्णा नदीच्या धामणेर ते पेरले या परिसराची पहाणी करून पाण्याचे नमुने संकलित केले होते. शहरातील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागाकडून या नमुन्यांचे अन्वेषण करण्यात आले. या अन्वेषणामध्ये ‘नदीच्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे रासायनिक प्रदूषण झालेले आढळले नाही’, असा खुलासा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांनी केला आहे.
अन्वेषण अहवालामध्ये म्हटले आहे की, नदीपात्रामध्ये गोड्या पाण्यात आढळणार्या नीलहरित शेवाळाची वाढ झालेली आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याला हिरवा रंग आलेला असून शेवाळाचा थर नदीपात्रामध्ये जमा झाला आहे.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !