प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जिवाचा मृत्यू झाल्याचा आरोप !

विटा – येथील ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे एका ४ महिन्यांच्या निष्पाप बालिकेला प्राण गमवावे लागले आहे. १५ जून या दिवशी दुपारी सोना तिरुपती राठोड या बालिकेला रुग्णालयात ‘पेंटा १’, ‘आयपीव्ही’, ‘रोटा १’ आणि ‘पोलिओ’ प्रतिबंधक लसी देण्यात आल्या होत्या. लसी दिल्यानंतर बालिकेला तीव्र ताप आला आणि रात्रभर ती अस्वस्थ होती. अंततः १६ जूनच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेमुळे संतप्त झालेले नातेवाईक आणि नागरिक यांनी रुग्णालयात प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. १५ जूनला अन्य २५ बालकांनाही लस देण्यात आली होती, त्यांच्या प्रकृतीची प्रशासनाने चौकशी का केली नाही ? असा प्रश्न करत नातेवाइकांनी रुग्णालयात ठिय्या मांडला. नातेवाइकांच्या मागणीनंतर बालिकेचा मृतदेह उत्तरीय पडताळणीसाठी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !