
सांगली, १७ जून (वार्ता.) – येथील पुष्पराज चौकाकडून बसस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावरील नटराज उपाहारगृहासमोरील मंदिराजवळ १६ जून या दिवशी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ‘हिट अँड रन’चा थरारक प्रकार घडला. मिरजेकडून सांगलीच्या दिशेने येणार्या एका भरधाव चारचाकीच्या चालकाचे नियंत्रण सुटून ती विरुद्ध दिशेला आली. या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ३ ते ४ दुचाकी आणि एका सायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनांची मोठी हानी झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर मोटारचालक वाहनासह पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे