१० गावांत १३ विहिरींचे अधिग्रहण, ५ टँकरद्वारे पुरवठा
आटपाडी आणि जत तालुक्यांतील गावांना प्रशासकीय साहाय्य

सांगली – जिल्ह्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील १० गावांमध्ये १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून ५ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली.
सध्या आटपाडी तालुक्यातील पिंपरी बु. कुरुंदवाडी, आंबेवाडी, पिंपरी खु. आणि जत तालुक्यातील गिरगाव अन् सिंदूर या गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे, तसेच खानापूर, शिराळा, तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ या टंचाईग्रस्त तालुक्यांतील विविध गावांमध्ये विहिरी अन् कूपनलिका अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे