|
भरतपूर (राजस्थान) – येथील पसोपा गावातील अवैध उत्खननाच्या विरोधात शेकडो साधूंकडून आंदोलन करण्यात येत होते. याविरोधात साधू बाबा विजयदास यांनी जुलै मासात आत्मदहन करून देहत्याग केला होता. त्यानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारने या भागातील अवैध उत्खनान थांबवण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापही ते पाळले गेले नसून येथे पूर्वीप्रमाणेच अवैध उत्खनान चालू आहे. यामुळे पुन्हा एकदा ३ सहस्र साधू आणि संत यांनी आंदोलन चालू केले आहे. यावर काँग्रेस सरकारमधील पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी साधूंना धमकी देत ‘सरकार साधूंना धडा शिकवेल’, असे म्हटले आहे.
Rajasthan: Tourism minister threatens Hindu seers protesting against illegal mining and stone crushers in Bharatpurhttps://t.co/MZp6AILwUX
— OpIndia.com (@OpIndia_com) November 11, 2022
१. संरक्षण समितीचे महासचिव ब्रज दास यांनी म्हटले की, सर्वांची भावना लक्षात घेता येत्या १ डिसेंबरपासून साधू, संत, गावकरी आणि कृष्णभक्त यांच्या वतीने आंदोलनास पुन्हा आरंभ करत आहोत. तत्पूर्वी येथे त्यांनी दीड घंटे धरणे आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यांनी संपूर्ण ब्रज भूमीतून उत्खनन थांबवण्याची मागणी केली, तसेच ‘येथे चालणारे अवैध उत्खनन थांबवण्यात आले नाही, तर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणीही दिली.
२. पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह ‘आम्ही उत्खनन बंद केले आहे; मात्र येथील क्रशर (दगडफोडीचे यंत्र) चालूच रहाणार आहे. त्यास सरकारने अनुज्ञप्ती दिली आहे.
साधू-संतांच्या आंदोलनामागील कारण !ब्रजमधील पर्वतांना पूजले जाते, तसेच त्यांना प्रदक्षिणा घातली जाते. त्यामुळे हे पर्वत उत्खननापासून वाचवण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन चालू आहे. लोकांचे श्रद्धा आहे की, येथीलच पर्वतावर भगवान श्रीकृष्णाने अवतार धारण केला होता. बद्रीनाथ आणि केदारनाथ यांचे जितके महत्त्व आहे, तितकेच या पर्वतांचे महत्त्व आहे. |
संपादकीय भूमिका
|