राजनांदगाव (छत्तीसगड) येथे बौद्धांच्या कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांची पूजा न करण्याची देण्यात आली शपथ !

राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख यांची उपस्थिती

राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख

राजनांदगाव (छत्तीसगड) – येथे ७ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या राजस्तरीय बौद्ध संमेलनाचा एक व्हिडिआ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात उपस्थितांना ‘मी गौरी, गणपति आदी हिंदूंच्या देवतांपैकी कुणालाही मानणार नाही आणि त्यांचीकधीही  पूजा करणार नाही. मी ‘ईश्‍वराने अवतार घेतला आहे’, यावर कधीही विश्‍वास ठेवणार नाही’, अशी शपथ देण्यात येत असल्याचे दिसत आहे. शपथ घेणार्‍यांमध्ये काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख याही उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी देहलीचे आम आदमी पक्षाचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनीही बौद्धांच्या कार्यक्रमात उपस्थितांना अशाच प्रकारची शपथ दिली होती.

सनातनविरोधी कार्यक्रम असेल आणि त्याचा संबंध काँग्रेसशी नसेल, असे कधी होऊ शकते का ? – भाजप

भाजपच्या नेत्या तता केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी हा व्हिडिओ ट्वीट करून म्हटले आहे, ‘छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या राज्यात हिंदूंना करण्यात येणारा विरोध टोकाला पोचला आहे. हिंदूंच्या श्रद्धांवर उघडपणे प्रहार केला जात आहे आणि काँग्रेसच्या महापौर हिंदु धर्माच्या विरोधात शपथ घेत आहेत. सनातनविरोधी कार्यक्रम असेल आणि त्याचा संबंध काँग्रेसशी नसेल, असे कधी होऊ शकते का ?’

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसच्या महापौरांच्या उपस्थितीत अशी शपथ घेतली जाणे, यात आश्‍चर्य वाटण्याची आवश्यकता नाही !
  • काँग्रेस म्हणजे ‘हिंदुद्वेषी पक्ष’ अशीच तिची आतापर्यंतची प्रतिमा आणि वाटचाल आहे ! यामुळेच हिंदु तिला राजकीय पटलावरून नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे तिला अजूनही लक्षात येत नाही, याला ‘विनाशकाली विपरित बुद्धी’, असेच म्हणावे लागेल !