
नवी देहली – येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी असलेले काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांना काँग्रेसने देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक समितीचे सदस्य बनवले आहे. पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शपथ समारोहाच्या कार्यक्रमातही प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावर भाजपचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी टीका करतांना म्हटले आहे की, काँग्रेसने टायटलर यांना या कार्यक्रमात सहभागी करून ‘ती अशा आरोपींना किती सुरक्षा आणि सन्मान देते’, हे पुन्हा समोर आले आहे. या मारेकर्यांनी गांधी परिवाराच्या साहाय्याने वर्ष १९८४ चे हत्याकांड घडवले असतांना अजूनही त्यांचा सन्मान केला जात आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने नेहमीच या आरोपींना पाठीशी घातले असल्याने त्यात नवीन काही नाही ! यातून अहिंसावादी गांधी यांचे नाव घेणार्या काँग्रेसची खरी मानसिकता काय आहे, हे नेहमीच लक्षात राहील ! |
अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !