राहुल गांधी यांची हमी कोण घेणार? – आसामचे मुख्यमंत्री सरमा यांचा सवाल
राहुल गांधी कर्नाटकच्या जनतेला हमी देत आहेत; पण राहुल गांधींची हमी कोण घेणार? जी व्यक्ती जनतेची हमी घेऊ शकत नाही, त्याची हमी आपण घेऊ शकता का ?
राहुल गांधी कर्नाटकच्या जनतेला हमी देत आहेत; पण राहुल गांधींची हमी कोण घेणार? जी व्यक्ती जनतेची हमी घेऊ शकत नाही, त्याची हमी आपण घेऊ शकता का ?
आपल्याला (कु. प्रणिती शिंदे यांना) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथ समजणार नाही. सिद्धेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमणाला संरक्षण देणार्या आपल्या पिताश्रींनी (सुशीलकुमार शिंदे यांनी) ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द जन्माला घातला. त्यामुळे ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ तुम्हाला समजणार नाही.
एम्.आय.एम्. आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी घालावी, अशी हिंदुद्वेषी सूचना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ते बेळगाव येथे प्रचारासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या हत्येचा भाजपच्या नेत्याने कट रचला आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचा संघर्ष गेल्या काही मासांपासून धगधगत आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी आंदोलन केले, आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत.
भारतावरील विविध आक्रमणांच्या वेळी मंदिरे ही आक्रमकांच्या केंद्रस्थानी राहिलेली आहेत. कासीम, गझनी, घोरी, खिलजी, बाबर, औरंगजेब इत्यादी मोगल आक्रमकांनी अयोध्या, मथुरा, सोमनाथ, काशी, पुरी, भोजशाळा, अशा भारतभरातील सहस्रो ठिकाणच्या मंदिरांचा विध्वंस करून, मूर्तींची विटंबना करून तेथून धनाची, संपत्तीची लयलूट केली होती.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांची सारवासारव !