
छत्रपती संभाजीनगर – एम्.आय.एम्. आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे दंगलीनंतर ३४ दिवसांनी जागे झालेल्या काँग्रेसने हा आरोप केला आहे. ‘आम्ही राज्यपालांची भेट घेतली असून या दंगलीची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वतीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. अजूनही या दंगलीचा अहवाल अद्याप आलेला नाही, हे राज्य सरकारचे अपयश आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
ते म्हणाले की, दंगल होऊन ३४ दिवस झाले आहेत; मात्र अजूनही या दंगलीविषयीचा अहवाल पोलिसांनी सादर केलेला नाही. दंगलीच्या आधी मासभर शहरात सभा घेऊन तणाव निर्माण करण्यात आला. सभांमध्ये प्रक्षोभक भाषणे देण्यात आली; मात्र अशी भाषणे करणार्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी याविषयी हलगर्जीपणा दाखवला. त्या वेळी कारवाई झाली असती, तर पुढचा प्रकार टळला असता. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींद्वारे दंगलीची चौकशी झाली, तर या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी.
संपादकीय भूमिका
|
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !
सनदी लेखापाल परीक्षेत सोहम मांजरेकर आणि श्रेयश शिंदे यांचे दैदीप्यमान यश !
‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी भिवंडी येथील संपादक डॉ. किशोर पाटील यांची निवड
मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश गडदेकडून २ गावठी पिस्तूल जप्त !
व्हीलचेअरअभावी आजारी महिला नगरसेविकेला उचलून नेण्याची नामुष्की !