कर्नाटक विधानसभा निवडणूक
मंगळुरू – १० मे या दिवशी होणार्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सध्या शिगेला पोचला आहे. ७ मे या दिवशी मंगळुरू येथे एका प्रचारसभेत बोलतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘राहुल गांधी कर्नाटकच्या जनतेला हमी देत आहेत; पण राहुल गांधींची हमी कोण घेणार? जी व्यक्ती जनतेची हमी घेऊ शकत नाही, त्याची हमी आपण घेऊ शकता का ? राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी सोनिया गांधी गेल्या २० वर्षांपासून एकाकी लढा देत आहेत.’’
#WATCH | Congress said we guarantee the people of Karnataka. Firstly, tell me who will take Rahul Gandhi’s guarantee? He lost elections in UP & went to Kerala. One day his face becomes like Saddam Hussein’s & another day like Amul baby: Assam CM Himanta Biswa Sarma in Karnataka pic.twitter.com/DdcBd8QrTg
— ANI (@ANI) May 7, 2023
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, जेव्हा ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्यात आली तेव्हा अनेक पक्षांनी त्याचा निषेध केला. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या सिद्धरामय्या कर्नाटकात सत्तेत असतांना त्यांनी ‘पी.एफ्.आय.’वरील खटले मागे घेत या संघटनेच्या आतंकवाद्यांची कारागृहातून सुटका केली होती.