चीनचे सैनिक प्रतिवर्षी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मार खाऊन जातात ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदलप्रमुख

भारत हा असा देश आहे ज्याने जगाला दाखवून दिले आहे की, शेजार्‍यांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्ही सदैव सिद्ध आहोत.

भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही ! – जर्मनी

विकास, लोकसंख्या आणि अन्य गोष्टींकडे पहाता भारताखेरीज अन्य कोणताही देश चीनचा सामना करू शकत नाही, असे विधान भारतातील जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमॅन यांनी एका मुलाखतीत केले.

भारताने चीनला ‘बालाकोट’प्रमाणे धडा शिकवावा ! – अजमेर दर्ग्याचे दिवाण झैनुल अबदिन अली खान

भारत हा कायमच शेजराच्या देशांसमवेत शांतता आणि चांगले संबंध रहावे, यासाठी प्रयत्नशील असतो; मात्र त्याचा अर्थ ‘भारत दुर्बल आहे’, असा घेतला जाऊ नये.

चीनकडून त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तान त्वरित सोडण्याची सूचना

काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !

तवांगमध्ये भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना चोपल्याचा व्हिडिओ प्रसारित !

या व्हिडिओमध्ये ३०० हून अधिक चिनी सैनिक तात्पुरत्या भिंतीवरील कुंपण तोडून भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच सज्ज भारतीय सैनिकांनी त्यांना जोरदार प्रतिकार करत त्यांना चोप दिला.

भारत आणि चीन यांनी सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा करावी ! – अमेरिका

युक्रेन अशाच प्रकारे अमेरिकेवर विसंबून राहिला; मात्र रशियाने युद्ध पुकारल्यावर अमेरिकेने त्याला साहाय्य केले नाही. त्यामुळे भारताने  पेंटगॉनच्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवून अमेरिकेवर कधीही विसंबून राहू नये !

भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची अधिक हानी ! – जागतिक माध्यमांचे वृत्त

हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, संघर्ष झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. यात २० भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने घायाळ झाले.

 ३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक !

केंद्रशासनाने संसदेत माहिती देतांना ‘देशात अनुमाने २०० चिनी आस्थापने ‘विदेशी आस्थापने’ म्हणून नोंदणीकृत आहेत. यासह देशातील ३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक आहेत’, असे सांगितले.

भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष : ३० सैनिक घायाळ

या संघर्षात चीनचे सैनिकही घायाळ झाल्याचे वृत्त आहे; मात्र या वृत्ताला केंद्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.