चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू  

बीजिंग (चीन) – चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली. यापूर्वीही चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बुलेट ट्रेनची गती अन्य रेल्वे गाड्यांच्या गतीपेक्षा दुप्पटीहून अधिक असते.