प्रत्येक क्षेत्रातील लोकांची वृत्ती भ्रष्ट होत असल्याची उदाहरणे समोर येणे हे गंभीर आहे. यासाठी बनावट सोने गहाण ठेवून कर्ज देणारे, घेणारे आणि संबंधित सर्वांनाच त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक

नगर, ४ ऑगस्ट – येथील नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने गहाण ठेवून अनुमाने ५ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी १५९ कर्जदारांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच हे सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देणारा सराफ विशाल गणेश दहिवाळकर यांच्याविरुद्ध आणि कटात सामील असलेल्या संबंधितांविरुद्धही शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. वर्ष २०१७ मध्ये हे कर्ज वाटप झाले होते. त्याची परतफेड न केल्याने जून २०२१ मध्ये गहाण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्यात आला. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला.
शाखाधिकारी अनिल आहुजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्कालीन शाखाधिकार्यांनी गेल्याच आठवड्यात आत्महत्या केली आहे. या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते. अर्बन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून यापूर्वीच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुन्या संचालक मंडळाच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी आहेत. त्यापैकी शेवगावचेही प्रकरण होते. भाजपचे माजी केंद्रीयमंत्री दिवंगत दिलीप गांधी त्या काळात अधिकोषाचे अध्यक्ष होते.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !