कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी विसर्जनाला जनसंघर्ष सेनेचा विरोध !

कोल्हापूरातील विशाळगडावर तर पुरातत्व विभागाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण झाले आहे. त्या विरोधात कधी जनसंघर्ष सेनेने आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे केवळ ब्राह्मणद्वेषापोटी विरोध करणे हे अनाकलनीय आहे !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेकडून साखरवाटप !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना होणारा विरोध ही मोठी विकृती ! अशांवर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध !

शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे ११ किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या काही स्मृती !

शिवप्रेमींमध्ये क्षात्रवृत्ती निर्माण करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी निधन झाले. ते जरी या जगात नसले, तरी त्यांचे इतिहासाविषयीचे प्रेरक विचार आजही सर्वांच्या मनात आहेत.

हिंदूंच्या ब्राह्मतेजाचे पुनरुज्जीवक !

बाबासाहेबांच्या जीवनातून खर्‍या इतिहास-संशोधकांनीही धडा घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी शिवचरित्र पोचवतांना त्यांच्याकडून मोठी समष्टी साधना घडली; म्हणून आई जगदंबेने त्यांचे नित्य रक्षण केले, हेही इतिहास-संशोधकांनी लक्षात घ्यावे.

कालपटलावर शिवतेजाचा अमीट ठसा उमटवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

इतिहासप्रेमी, संशोधक, लेखक, संघटक, कुशल वक्ता, अशा अंगभूत गुणांचे भांडार असणारे व्रतस्थ आणि ब्राह्मतेज अन् क्षात्रतेज यांचा संगम असलेले कर्मयोगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाकडून श्रद्धांजली !

शिवचरित्राद्वारे शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास जिवंत ठेवणारे पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश !

आधुनिक काळात अनेक शिवचरित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरांत पोचवले; परंतु शिवरायांना खर्‍या अर्थाने सामान्यांच्या ह्रदयसिंहासनात कायमचे आसनस्थ करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकमेव, हेच त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव आज त्यांच्या रहात्या घरी, पर्वती येथील पुरंदरे वाड्यात सकाळी ८ वाजता नेण्यात आला. त्यानंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राजकारणी, इतिहासकार, व्याख्याते, हिंदुत्वनिष्ठ आदी क्षेत्रांतील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांपैकी काही मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली येथे देत आहोत.

शिवचरित्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्‍वल्‍य इतिहास जिवंत करणारे पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश

कलियुगातील तपस्‍वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या निधनाने समस्‍त राष्‍ट्र-धर्मप्रेमींमध्‍ये हळहळ व्‍यक्‍त होत आहे.