साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. रमानंदअण्णा ।
संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ॥
संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ॥
‘ॐ परम पूज्य डॉक्टर वेदम् प्रमाणम् ।’ हा नामजप उच्चारतांना माझा भाव पुष्कळ जागृत होत होता आणि माझे ध्यान लागले. ‘हा नामजप करतच रहावे आणि तो माझ्या पेशीन् पेशीमध्ये जात असून माझी पेशीन् पेशी शुद्ध होत आहे’, असे मला जाणवले.
‘माझी आई चांगल्या गतीला गेली कि नाही ?’ हे मला स्वप्नात कळू दे.’ त्या रात्री मला स्वप्न पडले. मला आईच्या हातावर पुष्कळ चकाकणारे दैवी कण दिसले आणि त्या दैवी कणांकडे आई स्मितवदनाने पहात होती. ती आनंदी दिसत होती.
मी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।’, असे म्हणत असतांना अचानक समोर स्थुलातून पू. रेखाताई कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या दिसल्या आणि मला त्यांच्यात विठ्ठलाचे दर्शन झाले.
१ डिसेंबर या दिवशी आपण साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे यातील काही भाग पाहिला. आज अंतिम भाग ४. पाहूया . . .
आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्लोक सुचवले.
हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग । करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥
आपला मूळ स्वभाव चूक लपवण्याकडे असतो; पण समष्टीत चूक सांगितल्याने पापक्षालन होते, मनाला हलकेपणा जाणवतो. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूला ठेच बसून आपले मूळ रूप सर्वांसमोर येते. पुन्हा ती चूक परत करतांना मन कचरते.
‘देव किंवा गुरुदेव साधकाची श्रद्धा वाढून त्याची साधनेत लवकर प्रगती व्हावी, यासाठी किती प्रयत्नरत असतात, हे कळते ! आपण त्यांच्या चरणी सर्वस्व अर्पण केले, तरी त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही, त्यांच्या चरणी निरंतर कृतज्ञच राहू शकतो’
संध्याकाळी कामावरून घरी परततांना गाडीमध्ये श्री बगलामुखीदेवीचे स्तोत्र लावले होते. ते ऐकतांना मला जळका वास येऊ लागला. काही क्षणांतच तो वास नाहीसा झाला आणि होमाच्या वेळी येतो, तसा सुगंध येऊ लागला.