रामनाथी आश्रमातील कु. गौरी मुद्गल हिला आलेल्या विविध अनुभूती

१. महर्षींनी सांगितलेला नामजप करतांना आलेल्या अनुभूती

१ अ. महाशिवरात्रीला ‘ॐ परम पूज्य डॉक्टर वेदम् प्रमाणम् ।’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती : ‘२१.२.२०२० या दिवशी महाशिवरात्र होती. त्या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार ‘ॐ परम पूज्य डॉक्टर वेदम् प्रमाणम् ।’ हा नामजप रात्री १२ ते १.३० या वेळेत करायचा होता. तो नामजप करत असतांना देवाने मला दिलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. नामजप करायचा हे समजल्यावर माझ्या मनात ‘शिवाचाच नामजप करायचा असेल’, असा विचार आला. मी नामजपासाठी सभागृहात गेल्यावर मला तेथे शिवाचे चित्र ठेवलेले दिसले. नामजप करतांना मला ‘शिवाच्या चित्राकडे बघतच रहावे’, असे वाटत होते.

२. एक ताई शिवाच्या चरणी भावार्चना सांगत होती. त्याप्रमाणे मानस कृती करतांना माझा भाव जागृत झाला.

३. ‘ॐ परम पूज्य डॉक्टर वेदम् प्रमाणम् ।’ असा प्रत्येक नामजप उच्चारतांना माझा भाव पुष्कळ जागृत होत होता आणि नंतर माझे ध्यान लागले. आतापर्यंत माझा नामजप एवढ्या एकाग्रतेने कधीच झाला नव्हता. ‘हा नामजप करतच रहावे आणि तो माझ्या पेशीन् पेशीमध्ये जात असून माझी पेशीन् पेशी शुद्ध होत आहे’, असे मला जाणवले.

४. शिव आणि प.पू. डॉक्टर यांचे स्मरण करतांना मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

५. नामजप करतांना ‘मी हिमालयात गेले आहे’, असे मला जाणवत होते.

६. मला हा नामजप करतांना दैवी सुगंध आला.

१ आ. दुसर्‍या दिवशी मनात ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप चालू असतांना महर्षींनीही प.पू. डॉक्टरांचाच नामजप करायला सांगणे : महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २२.२.२०२० या दिवशी सकाळपासून माझ्या मनात ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप सतत चालू होता. नंतर रात्री महर्षींच्या आज्ञेप्रमाणे ‘ॐ परम पूज्य डॉक्टर वेदम् प्रमाणम ।’ हा नामजप करायचा आहे’, असे सर्वांना कळवण्यात आले. तेव्हा ‘सकाळपासून माझ्या मनात त्यांचाच नामजप होत असल्याची अनुभूती देवाने मला दिली’, असे मला वाटले.

२. रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आगमनाच्या वेळी रांगोळी काढण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

२ अ. आश्रमात श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे आगमन होणार असल्यामुळे रांगोळी काढण्याची सेवा करायची असणे आणि साडी नेसून प्रथमच रांगोळीची सेवा करतांना ती एकाग्रतेने अन् चांगली होणे : २६.२.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे आगमन होणार होते. त्या वेळी मला रांगोळी काढण्याची सेवा दिली होती. मी प्रथमच साडी नेसून रांगोळी काढण्याची सेवा केली. मी उत्तररात्री २ ते रात्री ८ वाजेपर्यंत साडीतच होते, तरी मला तिचा काहीच त्रास झाला नाही. एरव्ही मी २ घंटेच साडी नेसू शकते. साडी नेसून रांगोळी काढतांना माझे मन एकाग्र झाले होते आणि रांगोळी काढतांना मला पुष्कळ चांगले वाटले. मी नेहमी रांगोळी काढते. तेव्हा मला रांगोळीत योग्य प्रकारे रंग भरता यायचे नाहीत आणि माझ्याकडून चुका व्हायच्या; पण आज देवानेच रंग भरण्याची सेवा माझ्याकडून व्यवस्थित करून घेतली. ‘रांगोळीत रंग भरतांना ते रेषेच्या बाहेर गेले नाहीत’, ही मला मोठी अनुभूती आली.

२ आ. ‘देवावर श्रद्धा ठेवून सेवा केल्यावर देवच सेवेसाठी शक्ती आणि बळ देतो अन् तोच सेवा करवून घेतो’, याची तीव्रतेने जाणीव होणे : कधीकधी मी लवकर उठते. तेव्हा मला सर्दी होते; पण देवीच्या आगमनाच्या दिवशी मला सर्दी झाली नाही. एरव्ही साडी नेसल्यावर मला थकवा येतो; पण आज केवळ उत्साहच जाणवत होता. आज मला रांगोळी काढण्याची सेवा करतांना ताणही आला नाही. तेव्हा मला वाटत होते, ‘एरव्ही मी सेवा करते; पण आज ‘देवच सर्व काही करतो आहे. आपली देवावर श्रद्धा असली, तर काहीही त्रास होत नाही’, हे देवाने मला दाखवून दिले.’ आपण जरी म्हटले, ‘मी करते’, तरी ‘आपल्यापेक्षा देवाची शक्ती अधिक आहे’, हे आज मला पुष्कळ तीव्रतेने जाणवले. ‘सर्व काही देवच करून घेत आहे’, हे माझ्या लक्षात आले. मला देवीचे चैतन्यही अनुभवता आले.’

– कु. गौरी मुद्गल (वय १९ वर्षे ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक