साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. रमानंदअण्णा ।

पू. रमानंद गौडा

आमच्या आत्मोन्नतीची तळमळ ।
आमच्यापेक्षा तुम्हालाच अधिक ।
आमच्या चुका सांगूनी ।
सुधारण्याचा मार्ग दाखविला, तुम्ही पू. अण्णा ॥ १ ॥

साधनामार्गावर आमची मंदगती ओळखून ।
सेवेचे दायित्व देऊन ।
पुढचा मार्ग दाखवून ।
मार्गदर्शन केले, तुम्ही पू. अण्णा ॥ २ ॥

व्यष्टी-समष्टी साधनापथावर ।
आम्हा सर्वांना गुरुचरणांपर्यंत घेऊन जात आहात ।
साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. अण्णा ॥ ३ ॥

तुम्ही भाव, तळमळ, श्रद्धा ।
वाढवण्यास सांगितले आम्हाला ।
उदाहरणे देऊन प्रोत्साहन दिले ।
चैतन्याने भारित केले, तुम्ही पू. अण्णा ॥ ४ ॥

काही वेळा आमचे दोष-अहं काढण्यासाठी ।
कठोरपणे सांगितले ।
काही वेळा प्रेमभावाने ।
जाणीव करून दिलीत, तुम्ही पू. अण्णा ॥ ५ ॥

संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू ।
हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो ।
तुमच्या चरणी पू. अण्णा ॥ ६ ॥

‘साधकांची साधना झाली पाहिजे, गुरुकार्याची वृद्धी झाली पाहिजे’, अशी तीव्र तळमळ असणारे समष्टी संत आम्हाला दिले’, यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. शारदा योगीश, बेंगळुरू, कर्नाटक. (२८.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक