श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधिकेचे डोके आणि गाल यांवरून हात फिरवल्यावर साधिकेला आलेली अनुभूती

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केलेला स्पर्श साधिकेला प्रत्यक्षात देवीच कुरवाळत आहे’, असा जाणवून आलेली अनुभूती येथे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !

एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे सनातनचे ग्रंथच प्रसाराचे कार्य करणार आहेत.’’ ते आता सत्य होत आहे. सर्वत्रच्या ग्रंथ अभियानामुळे होत असलेले प्रचंड मोठे कार्य पाहिल्यास गुरुदेवांचे त्रिकालदर्शीत्व लक्षात येते.’

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

पुरोहितांनी अगदी निरपेक्षपणे धर्मशास्‍त्राच्‍या आधारे हिंदु संस्‍कृतीचा प्रसार सार्‍या विश्‍वात करायला हवा; परंतु बहुतांश पुरोहित असे करतांना दिसत नाहीत.

उपजतच दैवी गुण असलेल्‍या, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्‍यांचे मन जिंकणार्‍या आणि अध्‍यात्‍मातील अवघड टप्‍पेही लीलया पार करणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘दिवसभरात स्‍वतःचा अहं कुठे कुठे जाणवतो ?’, याचे निरीक्षण करून तो न्‍यून करण्‍यासाठी त्‍या देवाला शरण जाऊन त्‍याचे सतत साहाय्‍य घ्‍यायच्‍या.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त काढलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीच्‍या संरचनेची सेवा करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ अंकाच्‍या संरचनेची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ती सेवा करतांना मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील अतूट श्रद्धेच्‍या बळावर अपघातासारख्‍या कठीण प्रसंगाला स्‍थिरतेने तोंड देणारी सोलापूर येथील कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे) !

‘गुरुदेवांचे हात माझ्‍या डोक्‍यावर आहेत’, असे अखंड अनुभवत होते. ‘माझ्‍या डाव्‍या हाताला आता बोटे नाहीत’, याची मला भीती वाटत नव्‍हती किंवा भविष्‍याविषयी कोणतीही काळजी मला वाटत नव्‍हती.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍याप्रती अपार भाव असलेले श्री. मदनप्रसाद जयस्‍वाल !

श्री. जयस्‍वालकाका यांच्या विषयी साधकांना जाणवलेली सूत्रे, काकांना आलेली अनुभूती आणि काकांच्‍या संदर्भात संत अन् साधक यांना आलेल्‍या अनुभूती देत आहोत.

कलाकारांनो, गायनकलेला साधनेची जोड देऊन सात्त्विक पोशाख परिधान करून गायनकला सादर करा आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती घ्या !

स्वतःतील सात्त्विकता वाढल्यावर त्याचा कलेच्या सादरीकरणातही चांगला परिणाम दिसून येतो. कलाकारांनो, गायनकलेला साधनेची जोड देऊन सात्त्विक पोषाखामध्ये गायनकला सादर करा आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती घ्या. भावी कलाकार-पिढीपुढे आदर्श ठेवा.

सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळये (वय ८६ वर्षे) (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री) यांची सेवा करतांना झालेल्या भावस्थितीविषयी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगत असतांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

पू. आजींची सेवा करत असल्याचे दृश्य पहात असतांना माझे सर्व अवयव तिन्ही गुरूंकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात न्हाऊन निघत होते. तेव्हा मला स्वतःचा विसर पडला होता.

रात्री ध्यानाच्या वेळेत ‘निर्गुण’ हा नामजप करतांना कोल्हापूर येथील श्री. रणजित लोखंडे यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

तिन्ही गुरु बाहेर असलेल्या वाहनामध्ये बसले. त्यानंतर क्षणार्धात ते वाहन आकाशाकडे झेपावले आणि गोव्याच्या दिशेने जाऊ लागले.