श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधिकेचे डोके आणि गाल यांवरून हात फिरवल्यावर साधिकेला आलेली अनुभूती

कु. प्रतीक्षा हडकर

‘मध्यंतरी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. २५.५.२०२२ या दिवशी मी आश्रमातील माझ्या खोलीत जात असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. त्या माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी माझे डोके अन् गाल यांवरून हात फिरवला. त्या माझ्याशी बोलल्या आणि ‘नवचंडी यागाला खाली (आश्रमातील यज्ञस्थळी) येतेस ना ?’, असेही विचारले.

नंतर दिवसभर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केलेला स्पर्श मला सारखा जाणवत होता. ‘आज प्रत्यक्षात देवीच मला कुरवाळत आहे’, असे वाटून त्या स्पर्शाने मला भरून येत होते. ‘तो स्पर्श मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहे आणि ‘मी जणू हवेत तरंगत आहे’, असे मला वाटत होते.

देवा, श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना मला जवळून अनुभवण्यास दिलेस, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक