मुंबई – येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत वृद्धी होत आहे. त्यामुळे शहरात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वृद्धी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोनाबाधितांच्या संख्येत वृद्धी होत असली, तरी रुग्णालयात भरती होणार्यांची संख्या अल्प आहे. निर्बंधांचे उल्लंघन करून उपाहारगृह, चालू झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. इमारतींच्या गच्च्यांवरील (टेरेस) वरील पार्ट्यांचाही लोकांनी फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
(साभार : TV9 मराठी)