हिंदूंनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करण्याचा संदेश देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून ट्विटरद्वारे राष्ट्रव्यापी अभियान !

  • ‘#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नहीं’ हा हॅशटॅग ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थानी !

  • तब्बल २ लाख २५ सहस्रांहून अधिक ट्वीट्सद्वारे जागृती

नवी देहली – १ जानेवारीपासून चालू होणार्‍या वर्षाला काही अर्थ नसून त्याला वैज्ञानिक, नैसर्गिक अथवा आध्यात्मिक असा कोणताही आधार नाही. दुसरीकडे हिंदूंनी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करणे सर्वथा उचित आहे. यास कारण म्हणजे या दिवसाला वैज्ञानिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक आधार आहे. या विषयावर व्यापक जनजागृती करण्यासाठी भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ट्विटरद्वारे राष्ट्रव्यापी अभियान राबवले. याअंतर्गत ट्वीट्स करण्यासाठी ‘#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नहीं’ हा हॅशटॅग (चर्चेत आणण्यासाठी घेतला गेलेला विषय) वापरून ट्रेंड (एखादा विषय चर्चेत आणला जाणे) करण्यात आला. याला उदंड प्रतिसाद लाभून या विषयावर तब्बल २ लाख २५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. थोड्याच वेळात हा विषय राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थानी ट्रेंड झाला आणि साधारण ३ घंटे द्वितीय स्थानावर स्थिर राहिला. या अभियानामध्ये अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे कार्यकर्ते, उद्योगपती, अभिनेते, अधिवक्ता, विचारवंत, पत्रकार आदींनी भाग घेतला.

३० डिसेंबरच्या सायंकाळीही #MyNewYear_HinduNavVarsh हा हॅशटॅग वापरून ट्रेंड करण्यात आला होता. त्याद्वारेही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली.

हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या काही ट्वीट्स !

 

१. ‘१ जानेवारीला कुणीही शुभेच्छा देण्याचे कष्ट घेऊ नका ! याने आपण आपली संस्कृती नष्ट करत आहोत. नववर्षाचा आरंभ हा चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेपासूनच होतो. आपण हिंदु असल्याने हिंदुत्वाचे रक्षण करण्याचे दायित्वही आपणा सर्वांचेच आहे.’
– अरुण यादव, भाजप, हरियाणा.

२. ‘जेव्हा भारत पारतंत्र्याच्या जोखडामध्ये बांधला होता, तेव्हा १ जानेवारीला नववर्ष असल्याचे आपल्यावर बळजोरीने थोपवण्यात आले होते; परंतु आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही काही मूर्ख लोक १ जानेवारीला ‘हॅपी न्यू ईअर’ म्हणतात.’
– श्री. दशरथ गोयल, राजस्थान

३. ‘केवळ दिनदर्शिका पालटा, संस्कृती नाही. जागृत होऊया, जागृती करूया. भारतीय संस्कृतीचा अंगीकार करूया आणि पुढे जाऊया !’
– श्री. हरिश राजगुरु