थोडक्यात महत्त्वाचे
मुंबई शहरातील काही भागांमध्ये मतदानासाठी निरुत्साह होता; पण आग्रीपाडा, नागपाडा, चांदिवली, जोगेश्वरी आदी मुसलमानबहुल विभागांमध्ये मतदान तुलनेत अधिक प्रमाणात झाले.
मुंबई शहरातील काही भागांमध्ये मतदानासाठी निरुत्साह होता; पण आग्रीपाडा, नागपाडा, चांदिवली, जोगेश्वरी आदी मुसलमानबहुल विभागांमध्ये मतदान तुलनेत अधिक प्रमाणात झाले.
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान ठेवण्यात आले असून यामध्ये तब्बल ७९ टक्के कच्चे बंदीवान (न्यायाधीन बंदीवान) आहेत. या बंदीवानांच्या विरोधातील खटले विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. उर्वरित २१ टक्के बंदीवान गुन्ह्यात दोषी आढळल्यामुळे शिक्षा भोगत आहेत.
कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणार्या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोर्या होऊ नये, यासाठी देवस्थानाच्या व्यवस्थापनाने ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
वर्ष २०१९ च्या तुलनेत या वर्षी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. म्हणजे राज्यात काही लाख मतदान वाढले.
समाजद्रोह्यांना निवडणूक आयोगाचा जराही धाक वाटत नसल्यानेच ते अशा प्रकारचे कृत्य करू धजावतात.
खरे तर अशा अपप्रकारांकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. हिंदुत्वनिष्ठांनी जर हे उघड केले नसते, तर हा प्रकार चालूच राहिला असता. त्यामुळे प्रशासनातील संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा’च्या (सिडको) भूमीवर अवैधरित्या उभारलेला दर्गा, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे प्रशासनाने पाडली.
बागेश्वरमधील हे जागृत हिंदू वर्ष २०२४ चे जागृत हिंदू आहेत. ‘जे थप्पड मारल्यावर पळून जात होते’, असे हिंदू ते राहिलेले नाहीत.
इ.व्ही.एम्. यंत्र नेणार्या गाडीवर आक्रमण करणारी काँग्रेस निवडून आल्यावर कसे राज्य करील, हे लक्षात येते !