Sexually Abusive Professor : गोवा – विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा प्राध्यापक निलंबित

प्राध्यापक पदावरील व्यक्ती अशी वागत असेल, तर ती विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?

Mhadei Water Dispute : गोवा – व्याघ्र संरक्षण तज्ञ प्रस्तावित कळसा-भंडुरा प्रकल्पांना भेट देणार !

प्रस्तावित कळसा-भंडुरा प्रकल्पांमुळे म्हादई अभयारण्यातील नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार असल्याने गोव्याच्या वन खात्याने कर्नाटक सरकारला यापूर्वीच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

Noise Pollution : गोव्यात कर्कश संगीताच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन एकाचे निधन !

कांदोळी येथे एका क्लबमध्ये पार्टीच्या वेळी लावलेल्या संगीताच्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन या परिसरात रहाणार्‍या एका व्यक्तीचे निधन झाले. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Noise Pollution : गोव्यात ध्वनीप्रदूषणाचा मारा सहन करत सागरी कासवाच्या मादीने घातली ९८ अंडी !

समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते अणि त्यात अंडी घालून निघून जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनीप्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे आणि विद्युत् रोषणाई दिसते.

छत्रपती शिवरायांचा अधिकृत इतिहास केंद्र आणि राज्य सरकारने प्रसिद्ध करावा ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे

खासदार भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘देहली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, असा समस्त शिवप्रेमींचा आग्रह आहे.

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची १२५ कोटी रुपयांची देयके थकीत ! – चंद्रकांत पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री

हिवाळी अधिवेशनामध्ये सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने ५५ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. त्यांना संमती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही एक मासामध्ये पूर्ण होईल.

ठाणे येथे विजेचा धक्का लागून ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू !

या प्रकरणात उत्तरदायी असणार्‍यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी !

गृह विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये डी.एन्.ए. चाचण्यांसाठी लागणारे किट्स उपलब्ध नाहीत ! – ठाकरे गट

काही अतीमहत्त्वाच्या खटल्यांमधील लोकांना अप्रत्यक्ष साहाय्य करण्यासाठी या किट्सचा तुटवडा निर्माण केला असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

पुणे येथे इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत १६ शाळा कायमच्या बंद !

शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आर्.टी.ई. २००९ च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करून त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

‘वेब सिरीज’मुळे भारतीय संस्कृती बिघडत आहे ! – धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर

‘ज्या पद्धतीने आपण जानेवारी २०२४ च्या दृष्टीने राममंदिराची सिद्धता करत आहोत, तशीच सिद्धता येत्या जानेवारीत श्रीकृष्ण मंदिराचीही करा’, असे आवाहन त्यांनी केले.