पुणे – राज्यात गेल्या काही मासांपासून अनधिकृत शाळा, बोगस शाळा चालू असल्याचे उघडकीस आले होते. त्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करून त्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आर्.टी.ई. २००९ च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करून त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाईड डिस्ट्रीक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE) डेटानुसार १६ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शाळा खासगी, विनाअनुदानित आहेत. बहुतेक शाळा स्वयं-अर्थसाहाय्य तत्त्वावर चालवल्या जात होत्या. दौंड, पिंपरी, आकुर्डी, औंध, हवेली, मुळशी, हडपसर, वेल्हे आदी भागांसह शहर आणि ग्रामीण भागात या शाळा पसरल्या होत्या.
संपादकीय भूमिका :
|