गोवा विद्यापिठातील घटना
पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) : विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी गोवा विद्यापिठातील वाणिज्य शाखेतील एका साहाय्यक प्राध्यापकाला अखेर विद्यापीठ प्रशासनाने प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण होईपर्यंत सेवेतून निलंबित केले आहे.
संबंधित साहाय्यक प्राध्यापकाने काही मासांपूर्वी त्याच्या कक्षात एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याविषयी विद्यार्थिनीने विद्यापिठाकडे तक्रार नोंदवली होती; मात्र विद्यापिठाने हे प्रकरण गंभीरतेने न घेतल्याने पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पणजी महिला पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली होती. महिला पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३५४ आणि ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करून या प्रकरणी अन्वेषण चालू केले होते. या प्रकरणाची नोंद घेऊन महिला आयोगाने विद्यापिठाच्या अंतर्गत समितीकडून तात्काळ अन्वेषण अहवाल मागवून घेतला होता.
संपादकीय भूमिकाप्राध्यापक पदावरील व्यक्ती अशी वागत असेल, तर ती विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ? |