सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची १२५ कोटी रुपयांची देयके थकीत ! – चंद्रकांत पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री

प्रतिकात्मक चित्र

सातारा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे; मात्र बांधकामाची अनुमाने १२५ कोटी रुपयांची देयके थकीत आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सातारा येथे आल्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, ‘‘हिवाळी अधिवेशनामध्ये सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने ५५ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. त्यांना संमती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही एक मासामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर प्रलंबित देयकांचा विषय शिल्लक रहाणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम गतीने चालू आहे, त्याच गतीने पुढेही चालू रहाणार आहे, याची निश्चिती बाळगावी.’’